Breaking News

बी.एस.एन.एल. मध्ये सतर्कता जागृती सप्ताहा निमित्त प्रतिज्ञा ग्रहण कार्यक्रम संपन्न

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - भारत संचार निगम लिमिटेड, अहमदनगर, टेलिफोन भवन येथे प्रधान महाप्रबंधक  श्री. अजातशत्रु सोमानी  यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. एम. यु.  खान, उप महाप्रबंधक (मुख्यालय) , श्री. ए. व्ही गायकवाड, उप महाप्रबंधक   ( वित्त ),  श्री एस.पी.पवार , उप महाप्रबंधक संगमनेर  यांच्या उपस्थितीत सतर्कता जागृती सप्ताहा  निमित्त प्रतिज्ञा ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला.  
केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आदेशानुसार  या सप्ताहाचे आयोजन दि. 30 आक्टोंबर ते 04 नोव्हेंबर 2017 पर्यंत करण्यात आले आहे . कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उप मंडल  अभियंता (सतर्कता) श्री. डी. आर. मरकड  यांनी या सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहीती सांगीतली.प्रधान महाप्रबंधक  श्री. अजातशत्रु सोमानी  यांनी आपल्या  अध्यक्षीय  भाषणामध्ये  भारत संचार निगम लि. कंपनीच्या आचरण नियमावलीचे पालन  करुन कंपनीचे नांव उज्वल करण्याचे आवाहन केले.  आपल्या वैयक्तिक जीवनात सतर्कता  निर्माण करण्या साठी नियमित आचरण केल्यास सकारात्मक बदल घडवून आणु शकतो. नविन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सार्वजनिक जीवनातील भष्ट्राचार कमी होत आहे.  सर्व  गोष्टींमधे जनतेचा सहभाग हा फार महत्वाचा आहे, आपल्या हाती घेतलेल्या कामामध्ये नैतीकता ही महत्वाची गोष्ट असुन त्या द्वारे आपण काम केल्यास सतर्कता जागृती सप्ताहाचा  उद्देश सफल होईल असे सांगितले.  तसेच . एम. यु. खान, उप महाप्रबंधक (मुख्यालय) अहमदनगर यांनी भारत संचार निगम च्या आचरण नियमावलीचे  महत्व विषद केले.   या  कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी  श्रीमती एस.एन. शिरसीकर, एस.ए.तांबे, ए.बी.क्षिरसागर, के.जी.जाजु, एस.के.घुगे, के.एस. वाखुरे  यांचे बरोबर इतर सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग  बहुसंखेने उपस्थित होते.