Breaking News

नर्मलनगर येथे पाचशे हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - निष्ठेने देश सेवा हाच खरा धर्म आहे. देशाच्या विकासात्मक वाटचालीत सैनिकांचे योगदान मोठे असून, सैिंनकांमुळे प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे.  देशाच्या रक्षणाचे उत्तरदायित्व पार पाडून, सेवानिवृत्तीनंतर आपल्या पेन्शनच्या पैश्यातून माजी सैनिक राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना ह.भ.प. तुळशीराम  लबडे महाराज यांनी व्यक्त केली. 
जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने नर्मलनगर येथील हनुमान मंदिरा समोर पाचशे नागरिकांना हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी लबडे महाराज बोलत  होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, सचिव निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, नवनाथ टिमकरे, अ‍ॅड.पोपट पालवे,  गंगाराम रेपाळे, धर्मनाथ पालवे, आनंद गिते, ज्ञानदेव चेमटे, सोमनाथ गिते, गोकुळ काळे, संभाजी शिरसाठ, आव्हाड मेजर, अरुण पालवे आदि उपस्थित होते.
 प्रास्ताविकात शिवाजी पालवे यांनी फाऊंडेशनच्या वतीने वृध्दांसाठी काठी वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, मुलगी वाचवा अभियान जनजागृती व वृक्षरोपण मोहिम  आदि राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. जगन्नाथ जावळे यांनी सेनेत असताना मंगळवारी हनुमान चालिसा वाचनाचा उपक्रम घेतला जात होता.