Breaking News

खटाव तालुक्यातील 15 गावांचे 3 नोव्हेंबर रोजी चावडी वाचन

सातारा, दि. 31, ऑक्टोबर - खटाव तालुक्यातील म्हासुर्णे, त्रिमली, ललगुण, नागनाथवाडी, शिंदेवाडी, गिरजाशंकरवाडी, राजाचे कुर्ले, लांडेवाडी, भूषणगड, होळीचागाव,  मुसाडवाडी, गोरेगाव (निम), खातवळ, मरडवाक, मायणी या गावांतील शेतकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेखाली दाखल केलेल्या अर्जाचे  चावडी वाचन शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केले आहे.तरी उपरोक्त 15 गावांतील शेतकर्‍यांनी या चावडी वाचनास  उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार खटाव यांनी केले आहे.