Breaking News

परतीच्या पावसाने गंगापूर, वैजापूर, पैठण तालुके झाले टॅकरमुक्त

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - ऑगस्ट महिन्यात 50 च्या आसपास असणारी जिल्ह्यातील टँकरची संख्या परतीच्या पावसाने 26 वर आली आहे. तीन  तालुके टँकरमुक्त झाले आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला, तरी वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट कायम होते. वैजापूर तालुक्यात  वर्षभर टँकरद्वारे पाणी पुरविण्यात आला. जुलै महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. औरंगाबाद, फुलंब्री,  वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जुलै, ऑगस्ट महिन्यात तब्बल 56 टँकरद्वारे पाणीपुरवठा  करण्यात आला. जिल्ह्यात सध्या 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. गंगापूर तालुक्यातील वाळूज, तुर्काबाद, सिद्धनाथ वाडगाव, डोणगाव परिसरातील 17  गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद, वडोद बाजार, पिरबावडा आदी गावांना 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात  आहे.