Breaking News

महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील 350 लाईनमनला बोनस

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील 350 लाईनमनला अखेर बोनस मंजूर झाल्याने कर्मचार्यांमध्ये आनंद व्यक्त  करण्यात आला. महानगरपालिकेतील सर्व कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान बोनस व अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली होती. पाणीपुरवठा विभागातील  कर्मचार्यांना त्यातून वगळण्यात आले होते. बहुजन शक्ती कामगार संघटनेचे नेते कृष्णा बनकर यांनी याप्रकरणी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल व  आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. आयुक्तांनी सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला. 12, 24 वर्ष सेवा  झालेल्यांना समयश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाईनमनला बोनस मंजूर झाल्याबद्दल मंगळवारी बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष  कृष्णा बनकर यांनी सभापती गजानन बारवाल, उपायुक्त अय्युब खान यांचा सत्कार केला. धरमसिंग कानसा, बबन सरोदे, शेख युनूस, विनय मगरे, संजय  जेजुरकर आदी उपस्थित होते.