Breaking News

स्वच्छ भारत : शहराचे सर्वेक्षण पुन्हा होणार

सोलापूर, दि. 22, ऑक्टोबर - गतवर्षात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात शहराचा क्रमांक 126 वर गेला. पुढील वर्षात शहराचा पुन्हा  सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. चार गुणांचा सर्व्हे असून, यात नागरिकांचा सहभाग 35 टक्के असणार आहे. चार  हजार पैकी पहिल्या टप्प्यात 1400 गुणांवर आधारित काम महापालिकेस करावे लागेल. त्यासाठी महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी मनपा  झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेत याबाबत माहिती दिली. जानेवारी महिन्यात केंद्राचे पथक येणार असून, त्यासाठी आतापासून महापालिकेने  नियोजन करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीत व्या क्रमांकावर असलेले शहर स्वच्छ भारतमध्ये 126 व्या क्रमांकावर गेले. इंदौर शहर देशात पहिल्या  क्रमांकावर आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये तीन टप्प्यात काम होणार आहे. यात महापालिकेने केलेले नियोजन, थेट निरीक्षण आणि नागरिकांचे मत याचा  समावेश आहे.
असेआहे नियोजन : संकलनवाहतुकीसाठी 420 गुण असून, त्यात 13 प्रश्‍न आहेत. कचरा संकलन वाहतूक करून विल्हेवाट लावण्यासाठी 350 गुण आहेत.  यात आठ प्रश्‍नावली आहे. हागणदारीमुक्तीसाठी 11 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यासाठी 420 गुण आहेत.