पक्षाने तिकिट दिले तर लोकसभेची निवडणूक लढवू - आ. सतिश चव्हाण
औरंगाबाद, दि. 16, आक्टोबर - पक्षाने आदेश दिला तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे असे राष्ट्रवादी काँगे्रसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संकेत दिले. दिवाळी पहाटची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात आगामी निवडणूकीत सत्तांतर होणार असल्याचा दावा केला. निवडणूकांनी आणखी दिड वर्ष बाकी आहे. तेव्हा त्याविषयी आताच भाकित वर्तविणे कठिण आहे. मात्र 2014 प्रमाणे पुढील निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. केंद्रात भाजपाच मोठा पक्ष ठरेल. मात्र आतासारखी परिस्थिती असणार नाही असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. खा. चंद्रकात खैरे हे मोदी लाटेमुळे निवडून आले आणि आगामी निवडणुकीत मोदी लाट असणार नाही. त्यामुळे खैरे यांना पुन्हा लोकसभेत प्रवेश कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाला उमेदवारच नाही त्यामुळे त्यांना उमेदवार बाहेरून घ्यावा लागेल. विभागीय आयुक्त भापकर हे निवृत्तीनंतर भाजपचे उमेदवार होतील काय या प्रश्नाबाबत विचारले असता आताच त्याबाबत अंदाज करणे कठीण आहे असे ते म्हणाले.