Breaking News

सज्जनगड संस्थानच्या अध्यक्षपदी भूषण स्वामी

सातारा, दि. 05, ऑक्टोबर - सज्जनगड येथीलामदास स्वामी संस्थानच्या अध्यक्ष व अधिकारी स्वामीपदाचा पदभार समर्थाचे वंशज भूषण स्वामी यांनी स्वीकारला.  सज्जनगड येथे झालेल्या कार्यक्रमात विश्‍वस्त सु.ग.उर्फ बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी समर्थाच्या समाधीवर अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त दीपक पाटील, रामदासी केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जहागीरदार, मठपती  नरेंद्र बोकील, राजप्रसाद इनामदार, नंदकुमार मराठे, सज्जनगडचे ग्रामस्थ शंकर जाधव, नथुराम कुलकर्णी, तसेच सज्जनगड, करंडी, परळी येथील ग्रामस्थ उपस्थित  होते.
भूषण स्वामी म्हणाले, समर्थाचे विचोवर, तत्वज्ञान आणि साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. सज्जनगड येथील विविध उपक्रमांना  चालना देवून समर्थभक्त आणि सज्जनगडावर येणार्या प्रत्येकाला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अध्यक्षपदाचा पदभार  स्वीकारल्यावर भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक उपस्थित होते.