Breaking News

किनगांव राजा येथे अवैध दारू ग्रामपंचयत निवडणूकी मध्ये वापरणार्‍यांवर टांगती तलवार

बुलडाणा, दि. 03, ऑक्टोबर - दिनांक 2 ऑक्टोबर 2017 ग्राम जऊळका येथील गजानन साहेबराव मुंढे यांचे नावे शेत गट नंबर 115 मधील बांधलेल्या गोठा असून सदर चे शेत 1 दत्तात्रय विशवनाथ नागरे रा.जऊळका 2 शिवहरी ममताजी नागरे रा.जऊळका यांना बटाईने वाहतीस दिलेले असून सदर चे बांधलेला गोठा वजा खोलीचा वापर ते करीत असून खोलीची चाबी ही त्यांच्या कडे असते. म्हणून गांवातील ग्रामपंचयत निवडणूकी करिता सदर चे गोठ्या मध्ये 1 दत्तात्रय विशवनाथ नागरे रा.जऊळका 2 शिवहरी ममताजी नागरे रा.जऊळका यांची देशी दारूचे तीन बॉक्स म्हणून 144 नग बाटली आणून ठेवर्‍याची गोपनीय माहिती व शेत मालकाची तक्रार पोलीस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळणार्‍याने त्यांच्या सह पोलीस कर्मचारी पो.कॉ.शेषराव सरकटे ,पो.कॉ.जाकेर पाठण , महिला पो.कॉ.जानकी केवट होमगार्ड योगेश राठोड सह सदरच्या ठिकाणावर धाड टाकून सदर चे शेतातील गोठ्या मध्ये 144 नग देशी दारूच्या बाटली किंमत रुपये 8640 रु माल जप्त करून 1दत्तात्रय विशवनाथ नागरे रा.जऊळका 2 शिवहरी ममताजी नागरे रा.जऊळ यांच्या वर पोलीस स्टेशनला अ.प 177/17कलम 65 ई. म.पो.का.प्रमाणे गुन्हा दाखक केला असून पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेषराव सरकटे हे करीत असून सदरची दारू ही निवडणूकी मध्ये कोणत्या उमेदवार्‍या ची आहे कोणी आणली कोठून आणली इत्यादी चा तपास होऊन कारवाई होणार आहे. तसेच ग्राम वाघजाई येथे काल रात्री ठाणेदार सेवानंद वानखडे व सोबत पो.कॉ.दत्तात्रय लोंढे पो.कॉ.विनायक मोरे ना.पो.कॉ.गणेश बांडे , महिला पो.कॉ.जानकी केवट , मीना भिलावेलकर होमगार्ड इत्यादी सह छापा टाकला असता 1 रामेश्‍वर शिवहरी सानप वय 25 , 2 उमेश गजानन सानप वय 22 ,  3 सीताराम गोविंदा सानप वय 42 ,4 सचिन बाबुराव सानप वय 25 , सर्व रा. वाघजाई ता.सिंदखेड राजा यांना दोन मोटर सायकल 1 चक 28 छ 6012 ,2  चक 28 -त 7865 सह सहा बॉक्स देशी दारू , 288 दारूच्या बाटल्या असा एकूण रुपये 75 हजार 076 रुपये चा माल पकडुन पोलिस स्टेशनला अप 178 /17 कलम 65 ई .म.प्रो. का.प्रमाणे गुन्हा दाखक केला असून पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.दत्तात्रय लोंढे हे करीत असून सदर ची दारू निवडणूकी मध्ये कोणत्या उमेदवारा ची आहे.कोणी आणली , कोठून आणली इत्यादी चा सखोल तपास होऊन कार्यवाही होणार आहे.वाघजाई सारख्या ठिकाणी सदरची दारूही निश्‍चितच ग्रामपंचयत निवडणूकी साठी वापरली जात असून सदरच्या गुन्हा मध्ये आणखी लोक वाढण्याची शक्यता आहे.