Breaking News

मेहकर नगर परिषदेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

बुलडाणा, दि. 03, ऑक्टोबर - दि.2 आँक्टोबरला महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मेहकर नगर परिषद,तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.म.गांधी यांच्या पुतळ्या समोर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष कासम भाई गवळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवानंद पवार, वसंतराव देशमुख, भुषण भैया देशमुख, सुरेश मुंदडा, जयचंद बाटीया, कलीम खान शैलेश बावस्कर हे होते. कार्यक्रमात सुरुवातीला म.गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. या वेळेस कलीम खान, उपाध्यक्ष जयचंद बाटीया, वसंतराव देशमुख यांनी म.गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. आपले मनोगत व्यक्त करताना कासम भाई म्हणाले की, म.गांधी यांनी इंग्रजा विरुध्द अनेक चळवळ तसेच आंदोलन केले. तसेच अहिंसेचा मार्गाने देशाला स्वातंत्र मिळवून दिले. त्याच बरोबर देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात लाल बहादुर शास्त्री यांचाही सिंहाचा वाटा होता. असे प्रतिपादन नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांनी केले. या कार्यक्रमाला मो.अलीम ताहेर, पंकज हजारी, राजेश अंभोरे, निलेश मानवतकर, अलीयार खान , निलेश सोमन, संजय ढाकरके, मनोज जाधव, रामेश्‍वर भिसे, तोफीक कुरेशी, विकास जोशी, गायकवाड, तौफीक खान, युनुस पटेल, विजय म्हस्के, शेरू कुरेशी, अनिल चांगाडे, मदन चौधरी, तसेच नगर परिषदेचे पवन भादुपोता, बालु महाजन, अजय चैताने, सुधिर सारोळकर, संजय गिरी, रतन शिरपूरकर मं.नूर, वाकडे, हिवाळे, मुळे, गेडाम, हाडोळे, धुर्वे, पूजा खरात, बंडू जवंजाळ, संतोष राणे, विशाल शिरपूरकर, विलास दाभाडे, जफर, आकाश ,शंकर नेमाडे ,रमेश उत्पुरे, शंकर वरणगावकर, दायमा, सुरूशे, गायकवाड, खोडके, एजाज, मैंद, विष्णू म्हस्के, नशीर, प्रभाकर, विजू कटारे, तसेच नगर परिषदेचे सर्व कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन पंकज हजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन देवानंद पवार यांनी केले.