शास्त्रीजीं प्रमाणे मोदींनी पण राजीनामा द्यावा - भंडारी
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - रेल्वे अपघात झाल्यावर लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता आता एवढे रेल्वे अपघात झाले , मुबंईत 22 बळी गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा असे प्रतिपादन जेष्ठ नेते बाळासाहेब भंडारी यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस व फ़्रंटल च्या वतीने संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ ,उबेद शेख , युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव ढोणे ,मा महिला अध्यक्ष सविता मोरे, निजाम जहागीरदार ,मुन्नाभाई चमडेवाले , नलिनी गायकवाड ,.ज्ञानदेव भिंगारदिवे , शकील शेख, अमित चव्हाण , सारिका गाडे आदि उपस्थित होते. भंडारी पुढे म्हणाले काँग्रेस चे कार्य व सध्याचे मोदी सरकार यातील फरक लोकांच्या लक्षात आला व विकास कोठे हरवला व अच्छे दिन कधी येणार हेही लोकांना समजले आहे .