Breaking News

दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरणादरम्यान सेटला आग

मुंबई, दि. 02, ऑक्टोबर - गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडियो नंबर 14 मध्ये काल रात्री भीषण आग लागली. सेटवर लाकडी साहित्य व इतर  चित्रीकरणाचे साहित्य असल्यामुळे आगीने पेट घेतला. यामुळे आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला आहे. या सेटवर एका जाहिरातीचे शूटिंग सुरू असल्याची माहिती  समोर येत आहे.सेटवर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियत्रंण मिळवले. या  घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आग लागण्याचे अधिकृत कारण समजू शकले नाही.