Breaking News

रेल्वे स्थानकांच्या 50 मीटर हद्दीत फेरीवाल्यांना मनाई !

मुंबई, दि. 02, ऑक्टोबर - एल्फिन्स्टन रोड स्थानकात दुर्घटना झाल्यानंतर स्थानके, टर्मिनस यांच्यासह लोकल-मेल/एक्स्प्रेसमधूनही फेरीवाल्यांचे उच्चाटन  करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या 50 मीटर हद्दीतील फेरीवाल्यांविरोधातही कठोर कारवाई केली जाणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष  गोयल यांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी अनेक निर्णयांची घोषणा केली.
मुंबईतील रेल्वे स्थानकाकडील प्रवेशद्वार, पादचारी पूल, फलाटांवर फेरीवाल्यांनी जागा अडविले आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकांतून बाहेर पडताना अडचणी  येतात. याकारणास्तव एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.फेरीवाल्यावरील कारवाई ऐन गर्दीच्या वेळेस करणे अपेक्षित  आहे. कारवाईचे ध्वनीचित्रीकरण करण्याच्या सूचना ‘आरपीएफ’ला देण्यात आल्या आहेत.