आज एकलव्य सेवा संघाचा श्रीरामपुरात राज्यस्तरीय मेळावा.
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - एकलव्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य व राज्यस्तरीय भिल्ल वधूवर ग्रुप अहमदनगर यांच्या वतीने अधिकारी,कर्मचारी,व सामाजिक कार्यकर्ते यांचा श्रीरामपूर येथे इंदिराजीगांधी प्रियदर्शनी मंगल कार्यालय संगमनेर रोड बाजारतळ येथे रविवार दि 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता समाजाप्रती कार्यपूर्ती मेळावा आयोजित क रण्यात आल्याची माहिती आयोजक एकलव्य सेवासंघ संस्थापक,अध्यक्ष भाऊराव माळी श्रीरामपूर यांनी दिली.मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक निबंधक,पुणे बी आर माळी यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डी.वाय.एस.पी नाशिक साजन सोनवणे हे राहणार आहेत.तसेच डीवायएसपी प्रतापराव पवार चंद्रपूर गगन अण्णा सोनवणे, ना. तहसीलदार सुनील माळी, डॉ. माहेश्वरी गावित, कृष्णा गावित, प्रा. माळी, अव्वर सचिव बाबुराव माळी, बी. एल. माळे, बाळासाहेब माळी, प्रवीण मांडवी, उपायुक्त आयकर विभाग आर. बी. जाधव, आंबेकर एयर इंडियाउत्पादन शुल्क अधिकारी बी कें मोरे, माळी, तहसीलदार नंदुरबार ज्ञानदेव आहेर, अभियंता सुभाष मोरे, अध्यक्ष परिवर्तन फौंडेशन श्रीरामपूर उत्तमराव दाभाडे, दिलीप मोरे, उपजिल्हाधिकारी गुलाबराव मोरे, बाबासाहेब बर्डे, जिल्हाधिकारी परभणी सगा माऊची, ठाकर, प्रदेशाध्यक्ष एकलव्य मेजर कृष्णा सरदार व शिवाजी गांगुर्डे, रवींद्र बर्डे, कार्याध्यक्ष कैलास माळी, गटशिक्षणाधिकारी कें. एल. पटारे, रेवणनाथ जाधव हे मान्यवर उपस्थित राहणार असून.
या मेळाव्यास सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक भाऊराव माळी, भिल्ल समाज कोअर कमिटी, अहमदनगर, सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, राज्यस्तरीय वधूवर परिचय ग्रुप आदींच्या वतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यास सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक भाऊराव माळी, भिल्ल समाज कोअर कमिटी, अहमदनगर, सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, राज्यस्तरीय वधूवर परिचय ग्रुप आदींच्या वतीने करण्यात आले आहे.