ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन
मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - दिग्दर्शक कुंदन शहा यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.
शहा यांनी ’जाने भी दो ना यारो’ (1983), ’कभी हा कभी ना’ (1993), ‘क्या केहना’ (2000), ‘दिल है तुम्हारा’ (2002) सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ’जाने भी दो ना यारो’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. तसेच ’नुक्कड’ (1986) आणि ’वागळे की दुनिया’ (1988) या छोट्या पडद्यावरील मालिकांचेही दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचा ’पी से पीएमतक’ हा शेवटचा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरद्वारे शहा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.