Breaking News

सरकारी कार्यालयात झिरो पेंडन्सी लागू करणार - मुख्यमंत्री

पुणे, दि. 08, ऑक्टोबर - पुणे विभागीय कार्यालयाने झिरो पेंडन्सी अंतर्गत एक कोटी फाईलचा निपटारा केला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राज्यभर लागू करण्यासाठी  सामान्य प्रशासन विभागामार्फत अध्यादेश काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यामध्ये जाहीर केले.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  अद्ययावत पाच मजली पर्यावरणपूरक आणि देखण्या नूतन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय  राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव सुमित मलिक, प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पुणे विभागाने सुरू केलेली झिरो पेंडन्सी संपूर्ण राज्यात सुरू करणार असून त्या संदर्भातील अध्यादेश लवकरच काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. नागरिकांचे काम वेळात पूर्ण करणे प्रशासनाला कायद्याने बंधनकारक आहे. प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये आस्था निर्माण होणे  आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेते पुढे म्हणाले की, नवी इमारत भूकंपरोधक आहे, पण आता प्रशासनातील भूकंप रोखण्याची गरज आहे. नुकताच एक  वरिष्ठ अधिकारी लाच घेताना पकडला आहे. त्याला रोधक यंत्रणा तयार केली नाही, तर लोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी पार पाडता येणार नाही.