Breaking News

अंत्यसंस्काराचा खर्च महापालिका करणार

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - पुणे महापालिका क्षेत्रात रहिवाशी असलेल्या विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव  स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील रहिवासी असलेविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार  आहे. यासाठी महापालिकेच्या 2017 /18 च्या अंदाजपत्रकात तरतूद देखील केली आहे मात्र, अंत्यविधीसाठी लागणार्‍या साहित्याची निविदा काढून कारवाई करणे तांत्रिक दृष्ट्या  अडचणीचे असल्याने सर्वधर्मियांसाठी 3500 रुपये अनुदान देणे योग्य होईल असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.यासाठी संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना काही क ागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असून त्यानंतर ते पैसे बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे. असे प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव  स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.