Breaking News

मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आयुक्तांकडून पाहाणी

नाशिक, 18 ऑक्टोबर (हिं.स) : नाशिक महानगरपालिकेमार्फत जे.एन.ए.एम योजने अंतर्गत राबविण्यात येणार्‍या मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा मनपा आयुक्त अ भिषेक कृष्णा यांनी पाहाणी केली. त्यांनीमुकणे धरण जलाशय येथील हेडवर्क्सच्या कामांची पाहाणी केली. 
यावर्षी झालेल्या पावसामुळे मुकणे धरणात साधारण 95% इतका जलसाठा झालेला असुन, मागील 10 वर्षात पहिल्यांदाच एवढा जलसाठा झालेला आहे. सदर जलसाठयामुळे धरण  जलाशयातील हेडवर्कसची कामे बंद झालेली आहेत. सदयस्थितील हेडवर्कसच्या कामाची प्रगती 55% झालेली आहे. तथापी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय  हेडवर्क्सची उर्वरित काम सुरु करणे शक्य होणार नाही. यास्तव पाण्याची पातळी लवकरात लवकर कमी करुन मिळणे करिता रोटेशन लवकर सोडणेसाठी पाटबंधारे विभागाकडे  पाठपुरावा करणे बाबतच्या सुचना आयुक्तांनी दिल्या.
त्यानंतर त्यांनी मुंबई महामार्गालगत सुरु असलेल्या पाईपलाईनच्या कामाची पाहाणी केली. या दरम्यान राजुरफाटा, वाडीवर्‍हे, रायगड नगर, जैन मंदीर याठिकाणी सुरु असलेल्या क ामाची पाहाणी दयस्थितीत पाईपलाईनच्या कामाची प्रगती 60% झालेली आहे, सदर पाईप लाईन मुकणे धरण हेडवर्क्स पासुन पाथर्डी जलशुध्दीकरण केंद्रापावेतो टाकणेत येत आहे.  उर्वरित काम मार्च 2018 अखेर पर्यंत पुर्ण करण्याबाबत सुचना आयुक्तांनी दिल्या. मुकणे धरण व पाईपलाईनच्या कामाची पाहाणी झाल्यानंतर आयुक्तांनी विल्होळी जकात नाका येथे  सुरु असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची पाहाणी केली. जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची प्रगती सदयस्थितीत 70% झालेली आहे. सदर काम मार्च 2018 अखेर पर्यंत पुर्ण  करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेचे एकत्रित 60% काम पुर्ण झालेले आहे. तथापी मुकणे धरण जलाशय येथे गेल्या 10 वर्षात सर्वाधिक जलसाठा झालेला असल्याने धरण  जलाशयातील धरणातील पाणीसाठा लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीकोनातुन पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करुन व योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी  नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.