Breaking News

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 152 शिपाईपदाच्या भरतीचा निकाल पुढील आठवड्यात ?

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शिपाईपदासाठीच्या 152 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीचा निकाल पुढील आठवड्यात  लागण्याची शक्यता असून याबाबत लवकरच अर्जदार उमेदवारांना या बाबत कळवण्यात येणार असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  वपाईपदासाठीच्या 152 जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज पाठविणे बंधनकारक होते. त्यातील पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. मात्र  या परीक्षेनंतर जवळपास एक महिना उलटूनही परीक्षेच्या निकाल बाबत कोणतीही कल्पना अर्जदार तरुणांना देण्यात आलेली नाही त्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.  याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्याच्या शेवटी लागण्याची शक्यता वर्तवली असून याबाबत  लवकरच अर्जदार तरुणांना या बाबत कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.