Breaking News

रावेरला बसचा संप, मध्यप्रदेशच्या बसवर दगडफेक

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - एसटी कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संपला रावेरलाही प्रतिसाद मिळाला. काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या संपामुळे प्रवाशाचे खूप हाल झाले.  मंगळवारी एस टी परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संपाला सुरुवात झाली. 
संपात रावेर येथील आगारातील इंटक सह सात संघटनेचे सुमारे पावणे तीनशे कर्मचारी सहभागी झाले. तर कामगार सेना, यांत्रीक कामगार संघटनेने या संपात सहभागी न होण्याचा  निर्णय घेतला. तरीही सहभागी संघटनांनी आगारातून एकही बस बाहेर निघु न दिल्यामुळे संपाचा पहिला दिवस शांततेने पार पडला.
ऐन दिवाळीत हा संप असल्याने प्रवाशांचे हाल झाले रिक्षा अँपेरिक्षा द्वारे त्यांनी प्रवास केला. आजच्या संपामुळे येथील आगाराच्या दररोजच्या शंभर फेर्‍या रद्द झाल्या मुळे आगाराचे  आठ लाखाहून अधिक रूपयांचे उत्पन्न बुडाले. काल सकाळी पहाटे पाच ला कामगार सेना कर्मचार्‍यांच्या सहकार्याने रावेर - औरंगाबाद ही बस येथून निघाली मात्र ती जामनेर ला  अडविण्यात आली.या नंतर एकही बस आगारातून निघाली नाही.
येथील आगारात कडकडीत बंद असतांना व संप असल्याने बस स्थानकाकडे सकाळ पासून एकही प्रवाशी फिरकला नाही.असे असतांना आज सकाळी साडे अकरा वाजेचे सुमारास  मध्यप्रदेश प्रशासनाची बर्‍हाणपूर-रावेर बस क्रमांक एम पी 10 पी 0741 या बसच्या चालकाने बस येथील बस स्थानकावर नेत असतांना कर्मचार्‍यांनी केलेल्या दगड फेकीत बस  च्या खिडकीच्या काचा फुटल्या सुदैवाने बस मध्ये एक ही प्रवाशी नव्हता.
या संपात इंटक,मान्यता प्राप्त कामगार संघटना,महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन,संघर्ष गृप,कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटना,विदर्भ कामगार संघटना या सात संघटनांचे सुमारे  270 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.