भारत महासत्ता होण्यासाठी भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - नगरच्या एव्हरेस्ट एज्युकेशन अॅकराष्ट्रीय सुरक्षा अभियान यांच्यासंयुक्त विद्यमाने बालिकाश्रम रोडवरील एव्हरेस्ट अॅकॅडमीच्या हॉलमध्ये स्वावलंबी भारत, स्वदेशी भारत व चीन व भारत सद्यस्थिती या विषयावर सी.ए.ज्ञानेश्वर काळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी डॉ.रविंद्र साताळकर,अशोक गायकवाड,मालूजी शिकारे,कि रण सोनवणे,राजेंद्र गिते,संभाजी आव्हाड आदि उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अॅकॅडमीचे संचालक पोपटराव सोनवणे यांनी प्रास्तविक व स्वागत केले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी व अनेक नेत्यांनी स्वदेशीचा वापर या कल्पनेचा पुरस्कार केला.भारताला समर्थ बनवायचे असेल तर स्वदेशीचा आपण स्वीकार केला पाहिजे.सध्याच्या चीनच्या कारवाईमुळे भारता समोर,आर्थिक,सामाजिक तसेच संरक्षणाचे मोठे संकट उभे आह.याची जाणिव सर्वांना व युवकांना व्हावी,यातून जनजागृती होऊन यातून स्वदेशीचा वापर वाढावा,या उद्देशाने नगरमध्ये या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्क ार केला.निलेश लोढा यांनी देशप्रेमावर आधारित गीत सादर केले.त्यास विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
सी.ए.ज्ञानेश्वर काळे यांनी भारत व चीन संबंधाच्या सद्यस्थितीवर सविस्तर विवेचन केले.आपल्या देशाचे परदेशी मालामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान यावर बोलतांना ते म्हणाले, चीनने 1962 च्या युद्धात आपला 37500 चौरस किलोमीटर भुभाग बळकविलेला आहे.तसेच पाकव्याप्त काश्मिरमधील 5 हजार 180 चौरस किलोमीटर भुभाग पाकिस्तान कडून परस्पर चिनला मिळालेला आहे.भारतातील अरुणाचल प्रदेशामधील 9 हजार चौ.कि.मी. भागावर चीन आपला दावा सांगत आहे. यावरुन आपल्या देशामध्ये सध्या युद्धसदृष्य परिस्थितीही निर्माण झालेली आहे. निश्चितच भारतीय बाजारपेठ मोठी असल्यामुळे सध्या चीनकडून भारतामध्ये चीनी बनावटींच्या देव-देवतांच्या मुर्ती,तसबीरी,माळा,पचत्या,आकाश कंदील,खेळणी,प्लॅस्टिकची फुले,फोटो फ्रेम,सौंदर्य प्रसाधने,मोबाईल्स आदि विविध वस्तूंची आयात केली जाते.याचा वापर सर्व भारतीयांनी टाळावा,असे आवाहन काळे यांनी के ले.चीनला एकप्रकारे या वस्तू आपण विकत घेऊन मदत करत आहोत.आपल्या देशाचा पैसा संपूर्णत: चीनला मिळतो.यामुळे या आपल्या देशात आर्थिक मोठे संकट उभे होत आहे.चीन हा एकीकडे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करुन दुसरीकडे भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या देशाकडे शत्रुत्वाच्या नात्याने बघितले पाहिजे व त्यांचा माल निश्चितपणे घेणे टाळले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
चीनमुळे भारताच्या सुरक्षिततेला गंभीर धोका आहे हे आपण नुकतेच डोकलाम येथील लष्करी हलचालीवरुन ओळखले असेलच.याबरोबरच पाकिस्तानातील दशहतवादी मसूद अजहर व त्यांची संघटना जैसे मोहंमद तसेच सलाउद्दीन यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये चीन वारंवार विरोध करत आहे.यामध्ये चीनचा साफ उद्देश आपण लक्षात घ्यावा.सध्या भारत व चीन हे दोन्ही देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्नात असून भारत देश महासत्ता कसा होणार नाही असा प्रयत्न चीनकडून सातत्याने केला जात आहे.यासाठीच चीनच्या मालावर भारतील सर्व नागरिकांनी बहिष्कार टाकावा,असे कळकळीचे आवाहन ज्ञानेश्वर काळे यांनी बोलतांना केले. कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मानस सरवर यात्रेलाही चीनने बंदी घालून भारतीयांच्या श्रद्धेवर आघात केला आहे.ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी आडवून जलसंकटही निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न चालू आहे.हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.सध्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनकडून होणारी आयात जास्त व निर्यात कमी आहे.यामुळे चीनच्या उत्पादन विकत न घेता स्वदेशाचा आपण स्वीकार केला पाहिजे,असे आवाहन केले.हे झाले नाही तर भारतातील उद्योग-धंदे बंद पडून रोजगाराचे संकट पुढे येईल.हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे असे सांगून सर्वांना स्वदेशीच्या वापराची व स्वावलंबी भारत बनविण्याची सर्वांनी शपथ दिली.चीननेही आता भारत देश हा 1962 साल सारखा देश राहिलेला नसून एक बलाढ्य देश म्हणून सर्व जगभरात ओळखला जात असल्याने हे चीनने ओळखावे.उगचच भारत हा कुमकुवत देश असल्याच्या भ्रमात राहू नये,असा गर्भित ईशाराही ज्ञानेश्वर काळे यांनी दिला.या व्याख्यानासाठी एव्हरेस्ट अॅकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.