Breaking News

खानदेशातील धरणांमधून सोडले नदीत पाणी!

जळगाव, दि. 15, ऑक्टोबर - जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीत, अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी आणि तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात  आल्याने टंचाईग्रस्त अमळनेर तालुक्याला खूप मोठा दिलासा मिळाला. नदीकाठावरील गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न तूर्तास सूटणार आहे.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात बर्‍यापैकी पाऊस झाल्यमुले धरनात यावर्षी  साधारण 60टक्क्यांवर पाणी साठा आहे .धरणाच्या डाव्या कालव्यातुण पाणी सोडण्यात आले आह त्यामुळे .पांझरा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न सुटन्यास मदत होणार आहे  .पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंधखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायद होणार आहे .यामुळे पाणी  पातळी वाढण्यात मदत होणार आहे .
न्याहळोद , कवठळ, वालखेडा, जापी शिरडाने, कंचनपूर, मांडळ, वावडे, मुडी, बोदर्डे, लोण बु., लोण खु., लोण चारम, भरवस, बेटावद, भिलाली, शाहापूर, तांदळी इत्यादी गावांना  फायदा होणार आहे .त्याचप्रमाणे तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने बहादरपूर, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, शिरुड, मंगरूळ, तासखेडा, अमोडे, नंदगाव,  अंतुर्ली रंजाने, मुडी दरेंगाव, करणखेडे, अंबारे , खापरखेडा आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे. तापीलाही पाणी सुटल्याने पाडळसरे धरणात पाणी  साठा, तसेच कलाली डोह व जळोद गंगापुरीडोह भरल्याने शहरासह तापी काठावरील गावच्या विहिरींची पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
अमळनेर तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 23 गावांना पाणी टंचाई असून टँकर सुरू आहेत टँकर कोठून भरावेत असा प्रश्‍न प्रशासनाला पडला होता परंतु तालुक्याच्या  तिन्ही दिशांना असलेल्या बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा प्रश्‍न सुटणार आहे.