Breaking News

लाच घेताना मनपा लिपिकासह उपायुक्तास अटक झाल्याने खळबळ

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - नोकरीत कायम करण्यासाठी उपायुक्तांच्या सांगण्यावरून तीन लाख रूपयांची मागणी करणा-या महापालिकेच्या लिपिकास एक लाख रूपयांचा प हिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले. लाच घेण्यास सांगणा-या उपायुक्त पठाण यांनाही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रक रणी अधिक माहिती अशी की महानगरपालिकेत रोेजंदारीवर काम करणा-या कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्यासाठी मनपा उपायुक्त अय्यूबखान नूरखान पठाण यांच्या  सांगण्यावरून लिपिक दादाराव रखमाजी लाहोटी याने तक्रारदाराकडे तीन लाखाची मागणी केली.
तक्रारदार मनपामध्ये 1995 मध्ये दैनिक वेतनतत्त्वावर कनिष्ठ लिपिक म्हणून काम करू लागले. तक्रारदार यांची कायम करण्याची फाईल सर्वसाधारण सभेत ठेवण्यासाठी पठाण  यांनी तीन लाख रूपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता लिपिक लाहोटी याकडे एक लाख रूपये देण्यास सांगण्यात आले. हे पैसे स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक  खात्याच्या अधिका-यांनी लाहोटी यास रंगेहात पकडले. लाच घेण्यास सांगणा-या उपायुक्त पठाण यांनाही अटक करण्यात आली आहे.