Breaking News

दशक्रिया विधीनंतर अंघोळ करताना नदीत बुडाल्याने एकाचा मृत्यू

बीड, दि. 27, ऑक्टोबर - दशक्रिया विधीनंतर नदीवर अंघोळ करताना एकजण बुडाल्या नंतर त्याचा शोध न लागल्याने औरंगाबादहून जलतरण अतिदक्षता पथकास बोलावण्यात  आले होते. या पथकाने आज अकरा वाजता मृतदेह शोधून काढला. माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील तरूण भास्कर रामचंद्र चौरे (वय 23 वर्षे) व काही नातेवाईक दश क्रिया विधीसाठी बुधवारी (दि. 25) गोदावरी नदीवर आले होते. विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील र हिवाशी भास्कर चौरे हा नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी बुधवारी सकाळी 10 च्या दरम्यान गोदावरी नदीवर आला होता. विधीनंतर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले असता तो  अचानक पाण्यात बुडाला. भास्कर याच्या पश्‍चात एक भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे.