Breaking News

सहा वर्षाच्या बालिकेवर मावशीच्या नव-यानेच केला बलात्कार

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर घरात घुसून मावशीच्या नव-यानेच बलात्कार केल्याची घटना औरंगाबादमधील सातारा परिसरात घडली. या  संदर्भात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील नराधम आरोपीला अटकही केली आहे.
आपल्या मेव्हणीची सहा वर्षाची मुलगी एकटी असल्याचे पाहून घरात घुसून तिच्यावर बळजबरी केली. तिने ही गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून तिला धमकावून तिला कपडे घालण्यास  मदत करीत असताना पीडितेची भावजयी तेथे गेली. यावेळी भावजयीने त्या आरोपीला हटकले असता त्याने तिलाही अश्‍लील शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केले. या घटनेनंतर  आरोपी तेथून निघून गेला. झालेल्या प्रकारामुळे नणंद-भावजयी यांनी घाबरून आठ दिवस ही बाब कोणालाही सांगितली नाही. नंतर त्यांनी ही गोष्ट पीडित मुलीच्या आईला सांगितली  तेव्हा त्यांनी 25 सप्टेंबर रोजी आरोपीविरूद्ध सातारा ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये आणि बलात्कार करणे, विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविला.  त्या नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.