Breaking News

बागलाण तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक, दि. 23, ऑक्टोबर - बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने चिमुरड्याला उचलून नेले होते. रात्रभर शोधाशोध सुरु होता. सकाळी दहा  वाजेच्या सुमारास या चिमुरड्याचे शिर जंगलात मिळून आले.
तळवाडे भामरे हा परिसर डोंगरदरयांनी तसेच घनदाट जंगलाने वेढलेला आहे. येथील शेतात मेंढपाळाने मेंड्यासह तळ ठोकलेला होता. मेंड्यांजवळ हा चिमुरडा आपल्या वडिल्यांच्या  जवळ झोपलेला होता. दरम्यान, मध्यरात्री अचानक एक बिबट्या याठिकाणी आला आणि त्याने या मुलाला उचलून नेले.
घटनेची माहिती परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांनी या चिमुरड्याचा शोध घेणे सुरु केले. मात्र सकाळपर्यंत हा चिमुरडा कुणालाच मिळून आला नाही.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास काहीजण परिसरातील जंगलमध्ये शोधण्यासाठी गेले असता त्यांना याठिकाणी या चिमुरड्याचे शीर आढळून आले.
घनदाट जंगल असल्यामुळे नियमित बिबट्याचा याठिकाणी वावर असतो. कुणाच्या शेळ्या, मेंड्या आजपर्यंत बिबट्याचा शिकार होत होते. मात्र आता बिबट्या नरभक्षक झाल्याने नाग रिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले आहेत. याठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.