Breaking News

फटाके फोडण्यावरून दोन गटात हाणामारी


नागपूर, दि. 23, ऑक्टोबर - भाऊबीजेच्या दिवशी फटाके फोडण्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या लोकांनी एक मेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार वर्धा मार्गावरील अजनी चौकाजवळ चुना भट्टी परिसर आहे. या भागात उर्वरित राज्य कामगार क ल्याण महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव राहतात. मुन्ना यादव हे भाजप कार्यकर्ते असून त्यांची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. त्यांच्या जुन्या घराच्या बाजूलाच  मंगल यादव राहत असून ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. मुन्ना आणि मंगल एकमेकांचे नातेवाईक असले तरी त्यांच्यात अनेक दिवसांपासून पटत नाही. मुन्ना यादव त्यांच्या नातेवाईकांसह  21 ऑक्टोबर रोजी जुन्या घरी दिवाळी साजरी करायला गेले होते. भाऊबीजेच्या निमित्ताने मुन्ना यांच्या कुटुंबातील मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली. त्याला मंगल यादवच्या  गटातील मुलांनी विरोध केला. मुलांची बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे मुन्ना यादव यांचा मुलगा करण आणि अर्जुन बाहेर आले असता मंगल यादवच्या गटातील मुलांनी त्यांच्यावर ह ल्ला केला. करण आणि अर्जुनच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानंतर मुन्ना यादव यांच्या गटातील मुले धावली. त्यानंतर जोरदार हाणामारी सुरू झाली. मंगल यादव, पापा यादव  आणि त्यांचे 10 ते 12 साथीदार या हाणामारीत सहभागी झाल्याचे पाहून मुन्ना यादव यांच्या गटातील मंडळींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. एकमेकांना जबर मारहाण केल्यामुळे कुणाचे डोके  फुटले तर कुणाचा दात तुटला. नगरसेविका लक्ष्मी यादव या मध्यस्थी करायला गेल्या असता त्यांनाही काही आरोपींनी शिवीगाळ केली. त्यामुळे प्रकरण चिघळले. घटनास्थळी मोठा  तणाव निर्माण झाला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा पोहचला. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी धंतोली पोलिसार एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली.