Breaking News

परळीत दोन घरफोडया

औरंगाबाद, दि. 23, ऑक्टोबर - काल दिवाळीच्या रात्री परळी शहरात चोरटयाने चाळीस हजार रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केले . चोरटयांनी दोन ठिक ाणी घरफोडया केल्या. बळीराम राठोड याने कारखान्याला जाण्यासाठी मुकादमाकडून 30 हजार रुपये उच्च उचलली होती. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तीस हजार रोख  रक्कम, दोन ग्रॅमची नथ, तीन ग्रॅमचे सोन्याचे मणी, एक मोबाईल, असा एकूण 41 हजाराचा ऐवज चोरून नेला. तर दुसर्या घटनेत माणिकनगर भागातील रितेश रानभरे यांच्या घराच्या  खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करत दहा हजार रुपये रोख, दोन मोबाईल, असा ऐवज लंपास केला. या घटनेतील संशयीत आरोपी आकाश पौळ याला पोलिसांनी 24 तासांच्या आत  अटक केली.