Breaking News

परभणी तालुक्यातील विविध कामांची हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

परभणी, दि. 26, ऑक्टोबर - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील झरी गावातील विविध कामांची विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज पाहणी केली.
यामध्ये श्री. बागडे यांच्या हस्ते झरी येथील प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांच्या शेतातील वडार वैकुंठ भूमीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर  गावालगतच्या नाम नदीच्या पात्रातील जलसाठ्याची व अभियानाअंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पाहणी करून श्री. बागडे यांनी कृ षी विभागामार्फत लाभार्थ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप केले. गावातील वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा उपयोग करणार्‍या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीमध्ये श्री. बागडे यांच्या हस्ते  धनादेश देऊन गौरव करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाबाबत श्री. बागडे यांनी समाधान व्यक्त केले.