Breaking News

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा फसवी - दलवाई

रत्नागिरी, दि. 26, ऑक्टोबर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या एकाही कंपनीने रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पुलांची कामे निधीअभावी बंद  पडली आहेत. चौपदरीकरणाचे कामही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाबाबत केलेली घोषणा फसवी ठरली आहे,  असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी केला.
चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दलवाई म्हणाले की, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या कंपन्यांना  देण्यात आले, त्या कंपन्यांनी चौपदरीकरणापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करायचे कबूल केले होते. त्यासाठी येणारा खर्चही शासनाकडून दिला जाणार आहे. परंतु संबंधित एकाही कंपनीने  पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची इतकी वाईट अवस्था मी कधीही पाहिली नव्हती. पूर्वी  घाटामधील रस्ते चांगले होते. आता तेही चांगले राहिलेले नाहीत. पनवेलपासून चिपळूणला येईपर्यंत कमरेला पट्टा लावावा लागतो. अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात असताना सरक ारला त्याची काळजी नाही. भाजपचे नेते रेटून खोटे बोलत आहेत. भाजप सरकारने 2018 पर्यंत मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल असे सांगितले होते.  2017 संपायला आला तरी चौपदरीकरणाचे काम सुरूही झालेले नाही. चौपदरीकरणाची घोषणा झाली तेव्हा मी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीक रणासाठी निधी कुठून आणणार, याची विचारणा केली. तेव्हा गडकरी म्हणाले, देशातील रस्ते विकासासाठी मी शासनाचा निधी वापरत नाही. त्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची  योजना आहे. देशातील अनेक बँका थकीत आहेत. त्यामुळे कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. तरीही महामार्गाच्या चौपदरीकरणाठी निधी दिला म्हणून गडकरी ओरडून सांगत  आहेत. निधीअभावी पुलाची कामे बंद पडली हे याचेच द्योतक आहे.