Breaking News

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर व लातूर विभाग अव्वल

सांगली, दि. 26, ऑक्टोबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय  शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा सन 2017-18 चा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे आज संपन्न झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले गटात कोल्हापूर  विभागाने तर मुली गटात लातूर विभागाने प्रथक क्रमांक पटकविला.
या स्पर्धेच्या विजेत्या संघास महाराष्ट्र क्रीडाईचे सहसचिव दिपक सुर्यवंशी तसेच जितेंद्र सोनवणे व देविदास राजपूत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा  क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर, सहसचिव प्रदिप खिलारे, खजिनदार अशोक सरोदे, कोल्हापूर विभागाचे समन्वयक ज्ञानेश  काळे, जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे उदय गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले गटात नाशिक, मुंबई व पुणे विभागाने तर मुली गटात कोल्हापूर, पुणे व नाशिक विभागाने अनुक्रमे व्दितीय, तृतीय व चौथा क्रमांक पटकविला. या  स्पर्धेतून विजयी 17 वर्षे मुले व मुली हे राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी छत्तीसगड, दुर्ग येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.