Breaking News

अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ रुग्णालयात, नागपुरात उपचार सुरू

नागपूर, दि. 03, ऑक्टोबर - नागपुरात झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया पाचव्या एकदिवसीय सामन्यातील थर्ड अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ यांची प्रकृती खालावल्यामुळे  त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार, नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात  रिचर्ड इलिंगवर्थ यांनी थर्ड अम्पायर म्हणून जबाबदारी पार पडली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी रिचर्ड इलिंगवर्थ यांची प्रकृती  खालावली.त्यामुळे त्यांना मानकापूर परिसरातील अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आयसीसीच्या एलिट पॅनेलचे अम्पायर असलेले रिचर्ड एलिंगवर्थ यांनी इंग्लंडकडून वनडे व टेस्ट मॅचेसमध्ये प्रतिनधित्वही केले आहे. गेल्या 1 ऑक्टोबर  रोजीनागपुरात झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया लढतीदरम्यान टीव्ही अम्पायर होते. रविवारी मॅच झाल्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती  खालवली.अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.