Breaking News

’स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेअंतर्गत 28 टन कच-याचे संकलन

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत  शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून सुमारे 28.5 टन कचरा उचलण्यात आला.या मोहिमेमध्ये महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलज स्थायी समिती सभापती  सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासह महापालिका पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या,  ज्येष्ठ नागरिक संघ, विविध स्वयंसेवी संस्था, पत्रकार संघ, नागरिक व विद्यार्थी तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
’अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मधील लालटोपी नगर परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी या अभियानामध्ये ’अ’ प्रभाग  अध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक दीपक  कोटीयाना, हुसेन शिंदे, मकरंद पानसे, संजय देसाई, आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत दोन टाटा एसीई व एक ट्रकच्या सहाय्याने सुमारे दोन  टन कचरा उचलण्यात आला.
’ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्रभाग क्रमांक 17, 18 व 22 मधील थेरगाव विसर्जन घाट ते जिजाऊ उद्यान परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त  श्रावण हार्डीकर, नगरसदस्य सुरेश भोईर, नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, मोरेश्‍वर शेडगे, अश्‍विनी चिंचवडे, सहआयुक्त दिलीप गावडे, गुरुकुलचे गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ  पत्रकार अविनाश चिलेकर, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुनील दरवडे, नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठाण, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलीस मित्र संघ, पत्रकार संघ, पतंजली संघटना आदी सामाजिक संस्था व संघटना तसेच आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या  मोहिमेअंतर्गत सुमारे तीन टन कचरा उचलण्यात आला.’क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरातील प्रभाग क्रमांक 2, 6, 8, 9 मधील मोई चौक चिखली, देहू आळंदी  रोड, कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह परिसर, संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती व कुदळवाडी मनपा  शाळा, संपूर्ण भगतवस्ती, गुळवेवस्ती परिसर व ओव्हर ब्रिज, स्पाईन रोड सिटी चौक, अण्णासाहेब मगर स्टेडीयम नेहरुनगर परिसर येथे स्वच्छता अभियान  राबविण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत प्रभाग अध्यक्षा अश्‍विनी जाधव, नगरसदस्य राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, विलास मडीगेरी,  राहुल जाधव तसेच सारीका बोराडे, वसंत बोराडे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदाडे, सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम.  भोसले, आर. एम. बेद, विजय दवाळे, अंकुश झिटे, डी. एन. वाधवानी, वैभव कैंचनगौडार तसेच स्वंयसेवी संस्था, मनपा कर्मचारी असे एकूण 116 कर्मचारी  सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे 8.2 टन कचरा उचलण्यात आला.’ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 25, 26, 28, 29 मधील वाकड भूमकर  चौक ते अशोकनगरपर्यंत, कस्पटे चौक, चासखेड सोसायटी, बीआरटी रोड, साईचौक, पूर्वा सोसायटी, शिवार हॉटेल ते व्दारकाधीश गार्डन, देवकर पार्क ते रामकृष्ण  मंगल कार्यालय परिसर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम,  नगरसदस्य शत्रुघ्न काटे, आरती चोंधे, निर्मला कुटे, सागर आंघोळकर, लायन्स क्लब सदस्य, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद  बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, श्रीराम गायकवाड, आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, शशिकांत मोरे, योगेश फल्ले, राकेश सोदाई आदींनी स्वच्छता  मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेअंतर्गत सुमारे 8.5 टन कचरा उचलण्यात आला.’इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 4, 5, 7 मधील कृष्णानगर, दत्तनगर,  दिघी, दुर्वांकुर समोरील मैदान, गवळीनगर, पी.सी.एम.टी चौक ते लांडेवाडी चौक, भोसरी येथे झालेल्या या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्य लक्ष्मण उंडे, निर्मला  गायकवाड, प्रियंका बारसे, विकास डोळस, क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आरोग्याधिकारी पी.आर. तावरे, मुख्य आरोग्यनिरीक्षक डी. एम.  सासवडकर, आरोग्य निरीक्षक ऐ. व्ही. गुमास्ते, एस. एच. वाघमारे, एस. पी. घाटे, सी.आर. रोकडे यांच्यासह कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले  होते. परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत सुमारे एक टन कचरा उचलण्यात आला.’फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 1, 11, 12, 13 मधील  चिखली स्मशानभूमी रोड, पूर्णानगर आरटीओ ऑफीस, बीआरटीएस बस रोड, शनी मंदिर, ज्योतिबा मंदिर तळवडे, ताम्हाणेवस्ती, से. नं. 22 मधील इमारत क्र. 1  ते 15 परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्य प्रविण भालेकर, संगिता ताम्हाणे, कमल घोलप, क्षेत्रीय अधिकारी मनोज  लोणकर, सहाय्यक आरोग्याधिकारी डी. जे. शिर्के, मुख्य आरोग्य निरीक्षक जे. जे. गायकवाड, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, शांताराम माने यांच्यासह नूर ए इमान  सोशल तेहरीक चिखली, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, व्यसनमुक्ती युवक संघटना रुपीनगर, महाराष्ट्र विद्यालय रुपीनगर आदी संघटना सहभागी झाल्या  होत्या. परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे दोन टन कचरा उचलण्यात आला.