Breaking News

प्रशिक्षण न देता बोगस रेकॉर्ड तयार केल्याचे उघड

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - महापालिकेकडून राबविण्यात येणार्‍या विविध प्रशिक्षणाचे बोगस रेकॉर्ड तयार केल्याचा प्रकार शांतीपुरा, छावणी येथील संस्थेने केल्याचे मनपा अ धिकार्यांनी केलेल्या चौकशीत नुकताच उघड झाल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली. केंद्र शासनातर्फे महापालिकेमार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अ भियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्तरावर विविध संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यात बोगसगिरी करण्यात आल्याची तक्रार सिद्धार्थ गायकवाड यांनी केली होती.  मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांच्या अध्यक्षतेखाली लेखाधिकारी नजीर दुर्राणी, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने  संस्थांनी लाभार्थिंना प्रशिक्षण दिले का यासह अन्य तपासणी केली. तेव्हा बोगसगिरीचा गंभीर प्रकार पुढे आला. छावणी येथील सीएआयटी या संस्थेने तर हद्दच केली. कर थकविल्या  प्रकरणात मनपाकडून जी इमारत सील करण्यात आली होती, त्याठिकाणीच संस्थेचे कार्यालय असल्याचे दाखविले. मनपा अधिकार्यांनी भेट दिली तेव्हा कार्यालय सोडा, साधे  नामफलकही त्याठिकाणी नव्हते. विशेष म्हणजे ज्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे दाखविण्यात आले, त्यापैकी काहींचे जबाब घेतल्यानंतर नोकरी लावण्याचे आमिष दिल्याचे त्यांनी  सांगितल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. अहवालामध्ये सीएआयटी या प्रशिक्षण संस्थेकडे इमारत नाही, प्रशिक्षणाची व्यवस्था नाही. लाभार्थिंचे आधार  कार्ड, बँक खाते क्रमांक घेऊन प्रशिक्षणार्थिंची फसवणूक केली. प्रशिक्षणार्थींची बायोमेट्रिक हजेरी आवश्यक असताना एकाच दिवशी 90 सह्या घेण्यात आल्याचेही पुढे आले आहे. स मितीने सीएआयटी सोबतच जुनाबाजार येथील ताज कोचिंग क्लासेस, सौंदर्य ब्युटी पार्लर बालाजीनगर,अमेझॉन प्रशिक्षण केंद्र जुनाबाजार याचीही पाहणी केली आह