Breaking News

कृषी औजार खरेदीसाठी जिल्हा बँकेतर्फे कॅश क्रेडिट

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोचली आहे. आता कृषी औजारे व साहित्य विक्रेत्यांसाठीही कॅश क्रेडिट योजना  उपलब्ध केली आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. 
शेतकरी सभासदांसाठी वेळेत कर्जपुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अवजारे, ट्रेलर, ठिंबक व तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार पंपसेट आदी साहित्य पुरविणारे कं पन्यांचे अधिकृत विक्रेते व बँक अधिकार्‍यांच्या संयुक्त सभेत डॉ. सरकाळे बोलत होते. यावेळी सरव्यवस्थापक एस. एन. जाधव, एम. व्ही. जाधव यांची उपस्थिती होती.
डॉ. सरकाळे म्हणाले, शेतकर्‍यांना विविध शेतीपूरक कारणांसाठी कर्जपुरवठा केला जातो. प्रत्येक वर्षी नफयातून व्याजत सूट दिली जाते. तसेच ठिंबक व तुषार सिंचनासाठी वापर क ालावधीनुसार प्रतिएकरी पाच हजार इतकी अर्थिक मदत केली जात आहे. बँकेने सर्वसामान्यांना दिलास देण्याचे काम केले आहे. कंपन्यांचे अधिकृत विक्रेत्यांसाठी कॅश क्रेडिट  योजना उपलब्ध असून या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेतकर्‍यांना वेळेत माल, साहित्य मिळण्यातील अडचणी तसेच विक्रेत्यास जलद पेमेंट  मिळण्याबाबत चर्चा झाली. ट्रॅक्टर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शेळके, तसेच नेटा फेम, जैन इरिगेशन, फिनोलेक्स प्लास्ट्रो या कंपन्याचे विक्रेत्यांनी बँक पातळीवर येणार्‍या  अडचणी सांगितल्या. त्यांचे डॉ. सरकाळे यांनी निराकरण केले. यावेळी बँकेच्या सर्व विभागाचे व्यवस्थापक विभागप्रमुख उपस्थित होते.