Breaking News

जलयुक्त शिवारमुळे बळीराजाच्या चेहर्‍यावर फुलले हास्य!

अहमदनगर, दि. 24, ऑक्टोबर - सतत पडणार्‍या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि सन 2014-15ला भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्यामुळे   शासनाने डिसेंबर 2014पासून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली. सन 2019 पर्यंत टंचाईमुक्त महाराष्ट्र बघण्याचे स्वप्न शासनाने उराशी बाळगले. पाहता पाहता राज्यातील 188  तालुक्यांत 2 हजार 234 गावे आणि टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यातील 19 हजार 59 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने सुरु आहे. जिथे या अभियानाची  अंमलबजावणी झाली, त्या परिसराची पाहणी केल्यास शासनाची स्वप्नपुर्ती साकार झाल्याचे स्पष्ट होते.
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव, गोधेगाव, लौकी, घोयेगाव, भोजडे, वारी, शिरसगाव ही गावे कोळनदीच्या तीरावर येत असूनही गावातील लोकांची नेहमी पाण्यासाठी वणवण  असायची. मात्र सध्या या नदीवरील लौकी, भोजडे शिवारातील नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करुन जुन्या बंधार्‍याच्या भिंतीसाठी 6 लाख 43हजारांच्या निधीतून अस्तरीक रण केल्यामुळे पाणी लिकेजची समस्या कमी झाली. याशिवाय पावसाचे पाणीही भरपूर प्रमाणात अडवून ते जिरण्यास मदत झाली. परिणामी या शिवारातील विहीरींच्या पाणी पातळीत  लक्षणीय वाढ झाली असून शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले. पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होऊन रब्बी हंगामातील पिकांना यामुळे फायदा होणार आहे. शासनाने या अ भियानासाठी विविध योजनांतर्गत उपलब्ध निधीची सांगड घालून जिल्हा नियोजन समिती साडेतीन टक्के आणि इतर राज्य व जिल्हा स्तरावर असलेला मदत व पुनर्वसन निधीचा याक ामी वापर केला जात आहे. या अभियानातून ओढे-नाले जोड प्रकल्प, विहीर पुनर्भरण, नदीनाले खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण केले जाते.