सामाजिक कार्य करुन संघटना मजबुत करा : दिलीपकुमार सानंदा
बुलडाणा, दि. 09, ऑक्टोबर - समाजाचे ऋण फेडणे ही प्रत्येकाची जबाबदारी, अल्पसंख्यांक समाजाला आणखी प्रगत करण्यासाठी शिक्षणाची कास धरुन सर्व धर्म समभाव जपणार्या काँग्रेस पक्षासोबत राहुन जातीयवादी शक्तींना हद्दपार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे व सामाजिक कार्य करुन संघटना अधिक मजबुत करावी, असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
बुलडाणा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या खामगाव तालुका व शहराकरीता नवीन कार्यकारणी गठन करावयाचे असुन त्या संदर्भात 7 ऑक्टोंबर रोजी येथील जनसंपर्क कार्यालय येथे अल्पसंख्यांक समाज बांधवांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या बैठकीला बुलडाणा जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मो.वसीमोद्दीन, नगरसेवक इब्राहिम खॉ सुभान खॉ, नगरसेवक शेेख फारुख शेेख बिसमिल्ला, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, शेेख जुलकर शेख चाँद, रफीक इनामदार, माजी नगरसेवक परवेजखान पठान, अॅड.अशर्र्द यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ज्यांना समाजसेवेची आवड आहे अशा उत्साही युवकांनी संघटनेमध्ये येवून अल्पसंख्यांक समाज बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा व त्यांना न्याय मिळवुन द्यावा. शासनाच्या योजना समाजाच्या लोकांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन काम करावे एकमेकांना मदत करुन समाजातील गरजु व उपेक्षीतांना न्याय मिळवून देत लोकांची मने जिंकावी, असे सांगुन सध्या देशात नोटबंदी व जीएसटीमुळे सरकारने लोकांचा विश्वासघात केला असुन भविष्यात निश्चितच काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहे म्हणुन काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सुध्दा आपण कार्य करावे असे आवाहन सानंदा यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक परवेज खान पठान आपल्या भाषणात म्हणाले की, भाजपा ही अल्पसंख्यांक समाजात फुट पाडुन त्यांचा फक्त मतांसाठी वापर करीत आहे. तीन वर्षामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये कोणतेही विकासाचे कार्य झालेले नाही. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मागील 15 वर्षामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये कोटयावधी रुपयांची विकास कामे केली. ते प्रत्येकाच्या सुख दुःखात नेहमी धाउन येतात. भविष्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नगरसेवक इब्राहिम खॉ सुभान खॉ, अॅड.अर्शद, आसीफ अन्सारी यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मो.वसीमोद्दीन यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन बबलु पठान यांनी केले.
यावेळी अल्पसंख्यांक समाज बांधवांशी चर्चा विनीमय करुन लवकरच खामगाव अल्पसंख्यांक तालुका व शहराची कार्यकारणी गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाला पं.स.माजी सदस्य सज्जादउल्ला खाँ, शेख उस्मान शे.अब्दुल्ला, हफीज साहेब, डॉ.गुफरान,अश्पाक उल्ला खान, मो.हारुण, वाहब इनामदार, हिदायत खान, इम्रान खान, मन्सुर भाई, साजीद अहमद, असद हुसैन, अश्पाक उमरमुल्ला, आसीफ अन्सारी, डॉ.रियाज, रियाज पेंटर, अकबर खान, मेहमुद ठेकेदार, इलीयाज अहमद, एजाज देशमुख, रहिम चौधरी, सैयद नावेद, मुनीर शेख, शेेख राजु, मो.आलीम, सैयद नाजीम, उजैर अहमद खान, मो.रफीक, शे.मोबीन, शे.वसीम, काकु पठान यांच्यासह खामगांव शहर व तालुक्यातील अल्पसंख्यांक समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.