Breaking News

शिवसेनाला उत्तर देण्यासाठी भाजपकडे सक्षम नेते

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - शिवसेनाला उत्तर देण्यासाठी भाजपकडे सक्षम नेते असून त्यासाठी आम्ही कुणाला वापरणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. नारायण राणे यांना भाजपने पक्षात प्रवेशासाठी निमंत्रित केले नव्हते ते एनडीएत आले तर त्यांचं स्वागत आहे मात्र शिवसेनेला  विरोध करण्यासाठी भाजपला कुणाला वापरण्याची गरज नाही त्यासाठी भाजपत समर्थ नेते आहेत असे ते म्हणाले.