Breaking News

कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल रोको आंदोलन

ठाणे, दि. 03, ऑक्टोबर - एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यात घडू नये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज कळवा रेल्वे  स्थानकात रेल रोको करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कळवा रेल्वे स्थानकावरुन सीएसटीला जाणारी 9  वाजून 9 मिनिटांची लोकल आंदोलनकर्त्यांनी 2 मिनिटांसाठी अडवली होती. 
जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसहीत रेल रोको करण्यासाठी रुळांवर उतरले मात्र तातडीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मागे हटवले व लोकलचा मार्ग मोकळा केला.  त्यामुळे केवळ दोन मिनीटांसाठीच हे आंदोलन असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलेट  ट्रेनऐवजी लोकलने प्रवास करणार्‍यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केले होते.