Breaking News

निवृत्त कृषी अधिका-याचे घर फोडून चोरटयांनी चौदा तोळे सोने लंपास

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - निवृत्त कृषी अधिकार्याचे घर फोडून चोरटयांनी चौदा तोळे सोने, चांदी आणि रोख रक्कम पळविली.
शहरातील व्यंकटेशनगर भागात राहणारे निवृत्त कृषी अधिकारी अंकुशराव कोलते हे काल आपल्या कुटुंबियांसह घरी झोपले होते सकाळी आठ वाजता त्यांच्या  पत्नीला घराच्या बेडरूममधल्या कपाटाचं दार उघडलेलं दिसलं तर खिडकीच्या सळया उखडलेल्या दिसल्या.कपाटातील कपाट तोडून रोख एक लाख तीस हजार,  चौदा तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीच्या वस्तूहि गायब दिसल्या.रात्री एक ते पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय असून पोलिस तपास करत  आहेत.