Breaking News

आवक घटल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ

सोलापूर, दि. 24, ऑक्टोबर - ऐनदिवाळीत कांद्याने जनसामान्यांना रडवले तर, आता दिवाळी पश्‍चात लगेच काही कृषीमालाचे दर वाढले आहेत. यात वांगी, टोमॅटो आणि कोथिं बिरीचा समावेश आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर शहर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतूनही बर्‍याच पण नाशवंत कृषिमालाची दिवसाकाठी आवक होते. परंतु मागील  दोन दिवसात काही कृषिमालाचे दर अचानक वाढल्याचे दिसत आहेत. यात वांगे टोमॅटो यांचा समावेश आहे. 17 तारखेला बाजार समितीच्या सिद्धेश्‍वर बाजारपेठेत केवळ सात क्विंटल  वांग्याची आवक झाली होती. तर प्रति क्विंटलला ठोकमध्ये दर हजार 250 रुपये गेले होते. 100 किलोचे ठोक मधील किमान दर 800 रुपये होते. तर 16 तारखेला 54 क्विंटल  वांगे आले होते. सर्वाधिक 4000 रुपये दर, किमान दर 600 रुपये होते. आवक वाढली की दर पाडले जातात, हे जरी असले तरी किरकोळ बाजारात मात्र वांगे 60 ते 80 रुपये  किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटोची 16 ऑक्टोबरला आवक 12 हजार 232 क्विंटल इतकी होती. क्विंटलचे ठोकमधील दर 200 ते 2500 रुपये होते. तर 17 तारखेला के वळ हजार 454 क्विंटल इतकी आवक असल्याने दर 400 ते 3000 रुपये होते. आवक कमी झाल्याने लगेच परिणाम दरांवर झाला आहे. दर वाढत आहेत. यामुळे किरकोळ  बाजारात टोमॅटो 40 ते 60 रुपये किलोने विकले जात आहेत. सोलापूर बाजार समितीत कोथिंबीरीची दिवसाकाठी आठ ते साडेआठ हजार नग आवक होते. इतकी कोथिंबीर येत  असली तरी दर 200 ते 1300 रुपये 100 नग असे होते. परंतु किरकोळ बाजारात मात्र एक पेंढी 20 ते 30 रुपयांना विकली जात आहे.