Breaking News

गांगुलीच्या त्यागामुळे धोनी मोठा खेळाडू : सेहवाग

रांची, दि. 09, ऑक्टोबर - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी  स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे. धोनी आज जिथे आहे, त्यामागे सौरव गांगुलीचा त्याग आहे, असं सेहवागने म्हटलं आहे. ‘’तिसर्‍या क्रमांकावर  नवीन खेळाडूंना संधी द्यायची, असा प्लॅन कर्णधार असताना सौरव गांगुलीने तयार केला होता. सौरव गांगुली स्वतः सलामीला फलंदाजी करायचा. मात्र माझ्यासाठी  त्याने ती जागा सोडली. त्याचप्रमाणे 2005 साली गांगुलीने विशाखापट्टणम वन डेत तिसर्‍या क्रमांकावर धोनीला पाठवण्याचा निर्णय घेतला’’, अशी माहिती सेहवागने  दिली.
‘’स्वतःची सेट जागा सोडणारे आणि नव्या खेळाडूला संधी देणारे खुप कमी कर्णधार असतात. दादा नसता तर धोनी मोठा खेळाडू होऊ शकला नसता. दादाने नेहमी  नवीन खेळाडूंना संधी दिली’’, असंही सेहवाग म्हणाला. 5 एप्रिल 2005 रोजी झालेल्या विशाखापट्टणम वन डेत धोनीने पाकिस्तानविरुद्ध तिसर्‍या क्रमांकावर  फलंदाजी करताना 148 धावा केल्या होता. त्यानंतर धोनी स्फोटक खेळाडू म्हणून पुढे आला. ही त्याची दुसरी सर्वाधिक धावसंख्या होती. त्यापूर्वी धोनीने  श्रीलंकेविरुद्ध 183 धावा ठोकल्या होत्या.