Breaking News

अल्पवयीन मुलीला मारहाण; महिला आयोगाने दखल घेतल्यावर पोलिसांची कारवाई

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - कुर्ला भागात अल्पवयीन मुलीला मारहाण करून बेशुद्ध केल्याप्रकरणी आरोपी इम्रान शेखला पुन्हा अटक करण्यात आली आहे.  इम्रानवर ॠपॉस्को’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मंगळवारी (17 ऑक्टोबर) रात्री पीडित अल्पवयीन मुलगी शिकवणुकीवरून येत असताना काही टवाळखोर मुलांनी तिची छेड काढायला सुरुवात केली.  त्याला मुलीने विरोध केला आणि ती घरी जाण्यास निघाली. त्यानंतर रिक्षातून आलेल्या इम्रानने तिला मारहाण केली. त्यात ती जागीच बेशुद्ध पडली.  घटनास्थळी 6 ते 7 लोक होते. मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसते.
मारहाणीनंतर मुलीच्या पालकांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी किरकोळ गुन्हे लावून इम्रानला अटक केली. पण पुढे त्याची  जामिनावर सुटका झाली. त्यानंतर माध्यमांनी दाखवलेल्या चित्रिकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घटनेची दखल घेऊन पोलिस  आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब घेत इम्रानवर ॠपॉस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची  कारवाई केली.