Breaking News

जनता अपमानाचा बदला घेईल : हार्दिक पटेल

गांधीनगर (गुजरात), दि. 23, ऑक्टोबर - सत्तेविरोधात लढणार्‍या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट आहे, असा गंभीर आरोप गुजरातमधील युवा नेता  हार्दिक पटेल याने केला आहे. हार्दिक पटेल हा गुजरातमधील पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतो.
सत्तेविरोधात लढणार्‍या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट आहे. मला समजत नाही की, विकास केला आहे, तर खरेदी का?, असा आरोप करत हा र्दिक पटेल याने भाजपला थेट इशारा दिला आहे की, गुजरातमधील जनता इतकी स्वस्त नाही की, कुणी त्यांची खरेदी करावी. गुजरातमधील जनतेचा अपमान केला जात असून,  जनता या अपमानाचा बदला घेईल.