Breaking News

रेल्वेस्टेशन परिसरात गरिबांना मिठाई वाटप

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - बारा महीन्यांत येणार्‍या सणांपेक्षा दीपावलीचा सण हा काही वेगळाच आनंदोत्सव घेऊन येत असताना सर्वच   मिठाईचा आनंद घेत आताषबाजी  करत असतात.मात्र असंख्य गरीबांना दोन वेळचे पोटभर   जेवणही नशिबात नसते. त्यांना दिवाळीबद्दल काय वाटणार परंतु सामाजिक बांधिलकी जपत अनेक संस्था आणि कार्यकर्ते  गरीबांची दिवाळी साजरी करुन त्यांचे तोंड गोड करण्यास पुढे सरसावल्या असताना कोपरगावचे नगरसेवक विवेक सोनवणे प्रा.कमलाकर शिंदे आणि गरीमानगरी, अंबिकानगर  मित्रमंडळाने, कोपरगाव औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन, संजीवनी कारखाना परिसरात गरीबांच्या घरी मिठाई वाटुन त्यांचे तोंड गोड केले.