Breaking News

प्रबंध दाखल करण्याची तारिख वाढवण्याची कुलगुरूंकडे मागणी

औरंगाबाद, दि. 01, ऑक्टोबर - भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. बी. ए. चोपडे यांना एम. फिल. धारक विद्यार्थ्यांचा संशोधन प्रबंध जमा करण्याची तारिख डिसेंबर पर्यंत वाढविण्यात यावी या मागणी चे निवेदन े देण्यात आले.  विद्यापीठातील एम. फिल. धारक जुन्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध सादर करण्याची तारिख ही 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. जर प्रबंध सादर केला नाही तर  एका विद्याथ्याकडुन 5,000 रु. दंड आकारले जाईल असे प्रशासनाने सांगितले होत्या. त्यावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता  प्रबंध सादर करण्याच्या तारखेत डिसेंबर पर्यंत वाढ करण्याची विनंती कुलगुरुंना निवेदन देऊन केली.