Breaking News

एटीममध्ये भरण्यासाठी आणलेले बॅँकेचे 4 कोटी लंपास

पुणे, दि. 01, ऑक्टोबर - शहरातील सुरक्षाव्यवस्थेचे ’दिवाळे’ वाजल्याचे दाखविणारी घटना हडपरमध्ये घडली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एटीममध्ये बँकेचे  4 कोटी न भरता बोलेरो वाहनचालकाने ती रोकड घेऊन पोबारा केला आहे. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. नारायण खेडेकर  (रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. वाहनचालक नारायण खडेकर व बँकेच 2 कर्मचारी एटीममध्ये पैसे भरण्यासाठी पिवळ्या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये एटीएम  सेंटरजवळ पोहोचले होते. एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कामगार गाडीखाली उतरला. त्यावेळी चालक एटीएम मशीनपासून थोड्या अंतरावर गाडी घेऊन  गेला.