Breaking News

पैठण बाजार समिती लेखापालाची गळफास लावून आत्महत्या

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेखापाल संजय दशरथ तरटे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पैठण बाजार समितीत लेखापाल  या पदावर असलेले शहरातील कालापहाड भागात राहणारे संजय दशरथ तरटे (वय 38) यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या  केली. तरटे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अद्याप या  घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही.