Breaking News

लाल दिव्याची हौस उपायुक्तांच्या अंगाशी

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - लाल दिव्याची मोटार दिमतीला असावी म्हणून अग्निशमन विभागाची मोटार वापरणारे मनपा उपायुक्त निकम यांना आयुक्त मुगळीकर यांनी कारणे  दाखवा नोटीस बजावली आहे. ऐन दिवाळीत निकम यांनी अग्निशमन विभागाची अंबर दिव्याची मोटार वापरली होती. सोमवारी दिव्याच्या मोटारीसह निकम यांचे छायाचित्र व्हायरल  झाले. वृत्तपत्रांत याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज मुगळीकर यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यात निकम यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला असून दिव्याच्या  मोटारीच्या चालकाचाही जबाब नोंदवला जाणार आहे.
निकम यांनी कोणाला फोन करून लाल दिव्याची मोटार मागवून घेतली, त्यांनी अग्निशमन विभागाला पत्र दिले होते की फक्त फोनवरून मोटार त्यांच्या दिमतीला देण्यात आली. अ ग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांच्याकडूनही याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. मनपा आयुक्त ांच्या मोटारीलाही लाल दिवा नाही. केवळ दिवा हवा या अट्टहासापोटी तत्कालीन आयुक्त कांबळे यांनी अग्निशमन विभागाची मोटार वापरली होती. त्यानंतर कोणीही ही मोटार वापरली  नाही. आता निकम यांनी केवळ मोटारीवर दिवा हवा म्हणून ही मोटार वापरली. अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख या नात्याने निकम मोटार वापऊश् शकत असले तरी ती कोणत्या  कामासाठी वापरली, हे महत्त्वाचे आहे. निकम हे रजेवर होते आणि रजेच्या काळात वैयक्तिक कामासाठी त्यांनी मोटार वापरल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सां गितले. निकम यांचा खुलासा आल्यानंतर उपायुक्त अय्युब खान सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.