Breaking News

शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल

बीड, दि. 22, ऑक्टोबर - परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषि विभागाने राज्य शासनाच्या  कृषि आयुक्तालयाला पाठविले आहे. 
परतीच्या पावसामुळे कापसावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झालेला आहे. वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. काही ठिकाणी  कापूस हा काळा पडला आहे. परिणामी या कापसाला कवडीमोल भाव मिळत आहे. काढलेली बाजरीसुद्धा काळी पडली आहे. काही ठिकाणी बाजरीला कोंब  आलेले आहेत. त्यामुळे बाजरी आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या सर्वाचा सर्व्हे करून जिल्हा कृषि विभागाने जिल्ह्यातील 121  गावांतील शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल नुकताच कृषि आयुक्तालयाला पाठविला आहे.